Tuesday 27 March 2012

काय लिहू आणि कस लिहू तेच काळात नाही...कुठून सुरवात करू ते हि धड समजत नाही....आणि त्याचा विचार आला कि काळजात कस धडधड होते कि वाटत हृदय बाहेर धडकत आहे......
तो सोडून गेला आहे पण त्याची आठवण पाठ सोडत नाही.... खूप ठरवते आत्ता त्याला नाही आठवायचं....पण शेवटी वेड हे मन समजूनच घेत नाही.

आठवतात ते दिवस जेव्हा आम्ही दोघे फक्त एकमेकांसाठी जगलो होतो..पण आज...मरणाची वाट पाहतो आहे....एकमेकांच्या....का इतका तिरस्कार...तो हि त्याच्याविषयीच ज्याच्यासाठी कधी जीव द्यावासा वाटायचा.... खरच किती वाईट विचार करत होतो आम्ही एकमेकांबद्दल...पण ...जावूदे....त्याने मला फसवल याची शिक्षा त्याला देव देईलच...आणि मी फसवल्याची मला......

पण खरच कितीही  वाईट बोलले तरी आजही तितकच प्रेम आहे त्याच्यावर हे मी नाकारू शकत नाही...ती जागा कोणाला देवू हि नाही शकत... ती जागा त्याचीच आहे नेहमी आणि मी हि त्याचीच आहे कायमची ..........

नशिबात होत त्याच्या आणि माझ्या एकमेकांना भेटण अगदी अनाहूत पणे आणि अगदी तसेच भेटलो नकळत...भेटलो जेव्हा पहिल्यांदा सुचतच नव्हत काय बोलाव... शब्द तोंडात अडकल्यासारखे वाटत होते. तो समोर होता ज्याला इतके दिवस पाहण्याची आस लागून राहिली होती..खरच काहीच सुचत नव्हत...इतकी nervous कधीच झाले नव्हते मी.... हळू हळू भेटण वाढत गेल आणि एकमेकांबद्दलची ओढ हि.... नेहमी त्याच्याशीच बोलावे  अस वाटायचं. .. तो नेहमी समोर असावा...त्याचा आवाज ऐकत राहावं अस वाटायचं... खूप तत्वानाधरून बोलायचा...आपली तत्व कोणासाठी बदलणारा नव्हता तो मग माझ्यासाठी कशी बदलेल...पण माझ्यासाठी तो बदलेल असे वाटायचे मला पण मीच त्याला ओळखायला चुकले होते... माझ्यासाठी बदलला नाही तर आपल्या तत्वानासाठी त्याने मलाच सोडून दिले....................


आज एकटीच होते....ज्याला आपल मानल तो सोडून गेला...जे माझे होते ते पण मला सोडून गेले कारण मी त्याला जवळ केल होत... खरच हे एकटेपणाचे  दुख सहन नाही होत आहे मला....... मला कोणीतरी या एकटेपणाच्या दरीतून बाहेर काढा please .......  म्हणयला माणसे खूप आहेत आजूबाजूला पण त्यांच्यात असूनही मी एकटीच आहे........

कोणी देईल का साथ माझी या निष्ठुर जगात.....मला त्याला दाखवायचं आहे कि त्याच्या विना हि मी जगू शकते....मला हि मन आहे, सवेन्दना आहेत, मी हि माणूस आहे .....कोणी तरी समजून घ्या हे......कोणी तरी समजून घ्या...कोणी तरी समजून घ्या....

3 comments:

  1. Replies
    1. thanks Sushmey. tuzya itk changl lihta nahi yet pan..praytn karte aahe.....

      Delete
  2. खूपच छान....लिहिले आहे......भावले मनास खूपच.....!!!

    ReplyDelete