Tuesday 4 October 2011

Ek Prem Katha


तो वय २५,
तसा मुळचा मुंबईचा,
शिक्षणासाठी पुण्यात पग म्हणून जोश्यांकडे राहतोय.

ती वय २५,
नृत्य आणि संगीत शिकते,
आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच राहते...

तिचा नकार..
तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्नात,
आजही तिच्या पाठी,
ती घराजवळ पोहचते,
पाठी तो येतच असतो,
शेवटी हतबल होवून ती "तुला नक्की हवय तरी काय? "
तो: तुझ्या प्रेमाशिवाय दुसर आहे तरी काय?
ती: माझ लग्न ठरलाय, निर्णय झालाय,
तो: तू आनंदी आहेस? नक्की?
ती: "हंम" ती होकारार्थी मन डोलावते

मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात,
त्यांचा गैरसमज..आणि...
सोल्यावारचा चष्मा खाली पडतो,फुटतो....
गालावरचा हात तसाच राहतो...
बाबा तिच्याजवळ येतात, दोघेही नजरे आड होतात...
तिला अखरेच बघत तो........

अंधार पडू लागतो...
रस्त्यात समोरून आलेली गाडी त्याला अस्पष्ट दिसते,...
अंगावर येणार प्रकाश आणि मग....
सवर्त्र अंधार.............
दोन महिने उलटतात
फासे हळू हळू पालटू लागतात....
दोन आठवड्यांवर लग्न, पण गेले दोन दिवस ती त्याच्याच विचार करते आहे...
तिलाही काळात नाही अस का होतंय.....
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती....
आत्ता दिसेल नंतर दिसेल....तो दिसलाच नाही......
कॉलेजमध्येही तो बरेच दिवस आलाच नव्हता
जीवाच काही बर वाईटतर नाही न करून घेतल?
ती फार बैचैन झाली आहे...

शेवटी ती जोश्यांकडे पोहचते..
त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत ...
ती त्याचा नुम्बेर घेते, घाबरतच फोने लावते...
रिंग वाजते, फोनही उचलला जातो....
 तो तिचा आवाज ओळखतो
ती रडत असते...
रादर रडत बोलत असते....
त्याच्या मनात अनेक विचार येवून जातात....
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेवून जातात.....
तो काहीच बोलत नाही
दोघेही भावनाविवश होतात...
त्याला असह्य होत..तो फोने ठेवून देतो.....
ती त्या फोने कडे बघत राहते...
त्यालाच विचारत राहते " तो बोलला का नाही?"

दोन दिवसांवर लग्न..
आत्ता मात्र तिला सगळ असह्य होत चाललंय
त्याला भेटन गरजेच आहे कोणत्याही परिस्थितीत..
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते....
त्याच्या घरी पोहचते...

तो आत्ताच पुण्याला निघ्याल्याच कळत
तातडीने पुण्याची वोल्वो पकडते....
बस मध्ये शिरते...सीट जवळ येते आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही......
" तो असतो".....

काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात..
सोल्यातून पाणी वाहू लागत...
त्याच्या शेजारी बसत ती...

तो खिशातून एक वही काढतो ..
कागदावर काहीतरी खर्वडतो...
तिच्याकडे देतो...
ती वाचते...

"हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक "
" आहेत गोठले कंठी शब्द ते अनेक"
"भावनेत माझ्या असतील सर्व शब्द"
" कळतील का तुला बोल ते निशब्द"


भान हरपते

"कंठातले शब्द तू कंठात कोचणार का?"
"प्रेम तुझे खरे मी शब्दात मोजणार का? "

त्याला तिथेच मिठी मारते...कागद निसटून जातो..........